Ad will apear here
Next
प्रा. विकास उबाळेंना अर्थशास्त्राची डॉक्टरेट
अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवल्याबद्दल डॉ. विकास उबाळे यांचा सत्कार करताना त्यांचे माजी विद्यार्थी.

भिवंडी : बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विकास उबाळे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली.

डॉ. उबाळे यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही केवळ शिक्षणाची आवड असल्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नगरपालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळाच्या शहाड विभाग हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण करून पुढे आरकेटी महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले.

आर्थिक संघर्ष सुरू असतानाच डॉ. उबाळे यांनी बीएड, एमफिल, नेट असा शिक्षण प्रवास चालूच ठेवला आणि याच दरम्यान बीएनएन महाविद्यालयात ते अर्थशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. गेली १० वर्षे ते बीएनएन महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असून, सध्या ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद नारनवरे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व स्वखर्चाने पुस्तके देऊन डॉ. उबाळे यांना पीएचडी करण्यास प्रवृत्त केले.

शिक्षण सुरू असताना डॉ. उबाळे यांनी आंबेडकरी चळवळीशी कधी नाळ तोडू दिली नाही. आजही सामाजिक कार्यात झोकून देताना आंबेडकरवादी विचार कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देण्यासाठी, तसेच सामाजिक एकता निर्माण होऊन समाजातील वंचित घटकांचा विकास कसा होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतानाच शिक्षणच विकासाचा मार्ग आहे, ही जाणीव ते विद्यार्थ्यांना करून देतात. त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

डॉ. उबाळे यांना डॉक्टरेट मिळाल्याचे कळताच त्यांचे माजी विद्यार्थी पत्रकार मोनिश गायकवाड, जगन्नाथ ठक, ईश्वर खटाळ, अलिशा कसबे, साईनाथ यांनी डॉ. उबाळे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. उबाळे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZISBT
Similar Posts
पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात भिवंडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २०१५पासून सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत शिक्षणात होणाऱ्या बदलांवर चिकित्सा व्हावी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा शैक्षणिक केंद्राची मासिक शिक्षण परिषद पडघा-समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतीच पार पाडली.
सावंदे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती भिवंडी : स्त्री शिक्षणाचे बीज रोवणाऱ्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती तालुक्यातील सावंदे जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली.
डोहोळे व डोहोळेपाडा शाळांना महामानवांच्या प्रतिमा भेट भिवंडी : तालुक्यातील डोहोळे येथे राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते शुद्धोधन अशोक जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मणार्थ कोशिंबी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा डोहोळे येथे संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा, तर जिल्हा परिषद शाळा डोहळेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब
दिव्यात रंगले महिला जनजागृती कविसंमेलन दिवा : येथील रामवेणू काव्यमंच, कल्याण येथील लाख मोलाच्या कविता काव्यमंच, भिवंडीतील माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था, बहुउद्देशीय मानवसेवा संस्था, भांडूप येथील विकास प्रबोधिनी संस्था, कवी कट्टा कल्याण-मुंबई व ठाणे येथील जेष्ठ पत्रकार चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language